शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चालक २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

कोल्हापूर: कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयातील चालक म्हणून नेमणुकीस असलेल्या राहुल बट्टेवार यांनी दोघा तरुणांना रुग्णालयात कोरोना कक्षात वॉर्ड बॉय म्हणून नोकरी

 कोल्हापूर: कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयातील चालक म्हणून नेमणुकीस असलेल्या राहुल बट्टेवार यांनी दोघा तरुणांना रुग्णालयात कोरोना कक्षात वॉर्ड बॉय म्हणून नोकरी लावण्यासाठी पाच लाखाची लाच मागितली. तसेच त्यापैकी २५ हजारांची रक्कम टोकन म्हणून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक जिंतेंद्र पाटील,सहाय्यक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलीस नाईक संदीप पडवळ,पोलीस कॉन्स्टेबल मयूर देसाई व रुपेश माने आदींनी सहभाग घेतला.