वाधवान प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वर येथे जाण्यासाठी दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान कुटुंबियांना प्रवासासाठी परवानगीचं पत्र देणारे विशेष

 मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वर येथे जाण्यासाठी  दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक  वाधवान कुटुंबियांना प्रवासासाठी परवानगीचं पत्र देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच जागी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवासी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडल आहे. सरकारच्या आशिर्वादाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नसल्याचा आरोप करत अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस यांनी केली आहे.

राज्यात लॉकडाऊन असताना सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधु यांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी प्रवासी पास देण्यात आले होते.   ‘माझे फॅमिली फ्रेंड’ असा उल्लेख करत गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच गाड्यांसाठी विशेष पास इश्यू केला होता. या सर्वांना कौंटुबिक अत्यावश्यक कारणासाठी महाबळेश्वरला जायचं आहे, असंही त्यावर नमूद करण्यात आलं होतं. ही बाब समोर आल्यानंतर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र,विशेष गृहसचिव आमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलं आहे. यावर अशा प्रकारचा पास कोणताही अधिकारी आपल्या भरवश्यावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सराकरमधील किंवा सरकार चालवणारे प्रमुख लोक आशिर्वाद देत नाही किंवा इशारा देत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडणे शक्य नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. म्हणूनच अमिताभ गुप्ता यांनी क्लिनचिट मिळाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.