सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : द कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्सामीनेशन (सीआयएससीई) मंडळाकडून आयसीएसई (दहावी) आणि आयएसई (बारावी) च्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात

 मुंबई : द कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्सामीनेशन (सीआयएससीई) मंडळाकडून आयसीएसई (दहावी) आणि आयएसई (बारावी) च्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार आयसीएसईची परीक्षा २ ते १२ जुलै तर आयएससीची परीक्षा १ ते १४ जुलैदरम्यान होणार आहे.  दहावीचा २ जुलैला भूगोलाचा पहिला पेपर असून बारावीचा १ जुलैला जीवशास्त्र भाग १ हा पहिला पेपर असणार आहे.दहावी आणि बारावीच्या प्रत्येक पेपरनंतर एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुळे १९ ते ३१ मार्चदरम्यान होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले होते.यामध्ये दहावीचे सहा तर बारावीचे आठ पेपर होते. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखून परीक्षा घेण्याचे निर्देश बोर्डाकडून देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच परीक्षा केंद्रावर जाताना आणि बाहेर पडताना गर्दी टाळण्याच्या सूचना विद्यार्थ्याना द्याव्यात अशा सूचनाही बोर्डाकडून करण्यात आल्या आहेत.