पीकविम्याला मुदतवाढ देण्याची केंद्र सरकारची तयारी, पण…, रावसाहेब दानवेंनी दिली माहिती

केंद्र सरकार पीकविम्याला मुदतवाढ देण्यात तयार आहे. मात्र, त्यासाठी राज्याकडून तशी विनंती अथवा मागणी यायला हवी. शेतकऱ्यांची वीमा भरण्याची इच्छा असूनही पोर्टल बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येत आहेत. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्यामुळे मी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली

    पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची आजची शेवटची मुदत आहे. मात्र गेल्या वर्षी ह्या पीकविम्याच्या बाबतीत प्रचंड गोंधळ झाले होते. तसंच शेतकऱ्यांना वेबसाईट संदर्भातल्या समस्यांसह अनेक तांत्रिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे पीकविम्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

    दरम्यान याच संदर्भात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी काल केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली. केंद्र सरकारची मुदतवाढ देण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

    या भेटीनंतर रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, केंद्र सरकार पीकविम्याला मुदतवाढ देण्यात तयार आहे. मात्र, त्यासाठी राज्याकडून तशी विनंती अथवा मागणी यायला हवी. शेतकऱ्यांची वीमा भरण्याची इच्छा असूनही पोर्टल बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येत आहेत. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्यामुळे मी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली आहे.