नरेंद्र मोदी, फडणवीस आणि माझ्यावर कोणी काहीही बोललेलं चालतंय का ? – चंद्रकांत पाटलांचा सवाल

कोल्हापूर : शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून गोपीचंद चुकला म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत

कोल्हापूर : शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून गोपीचंद चुकला म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात प्रसिद्धी माध्यमांना दिली. पण या महाराष्ट्रात काय चाललंय इतरांनी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेलं चालतंय का ?  असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. या टीकेनंतर राज्यभर पडळकर यांचा निषेध व्यक्त होत आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर हा समजूतदार कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिले नाही हा पडळकर यांचा अनुभव असेल. मात्र, शरद पवारांचा अनादर व्यक्त करण्याचा पडळकर यांचा हेतू नव्हता असे सांगून एक प्रकारे त्यांनी पडळकर यांना सावरून घेतले.
ते म्हणाले काही माध्यमे तर अग्रलेखात काय काय लिहितात ? त्या अग्रलेखाची भाषा काय असते? असे सांगत  चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला अप्रत्यक्षपणे टोला  लगावला. राजकारणात शब्द जपून वापरावे लागतात, कारण त्याची जखम खूप दिवस असते, सगळ्यांनीच राजकीय संस्कृती जपायला हवी असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.