chandrakant patil and dhanajay munde

धनंजय मुंडे(dhananjay munde) यांनी संवेदनशीलपणा दाखवत मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, अन्यथा शरद पवार (sharad pawar)यांनी नैतिकतेच्या जबाबदारीने मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. त्यांनी तो दिला नाही तर भाजप आंदोलन करेल,असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. 

पुणे : धनंजय मुंडे(dhananjay munde) यांनी संवेदनशीलपणा दाखवत मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, अन्यथा शरद पवार (sharad pawar)यांनी नैतिकतेच्या जबाबदारीने मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. त्यांनी तो दिला नाही तर भाजप आंदोलन करेल,असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil) यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांची चौकशी सुरु राहील, पण रेणू शर्मा यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. यामुळे राजीनामा देण्याची मागणी केली होती, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

पवारांच्या भुमिकेने भ्रमनिरास

पाटील म्हणाले की, शरद पवार आधी म्हणाले होते की आरोप गंभीर आहेत. यासंदर्भातील विषयांवर पवार हे नेहमीच कडक धोरण स्वीकारतात. पवार यांच्या ५० वर्षांच्या राजकीय प्रवासात ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झाले त्यांना पवार यांनी कधीच पाठीशी घातले असे झाले नाही. पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने सर्वांचाच भ्रमनिरास झाला.

. . तर आंदोलन करू
धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर भाजपा महिला मोर्चा सोमवारपासून जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येणार आहे. असे पाटील म्हणाले. ते म्हणाले की, यापूर्वीही १९८४ मध्ये रामराव आदिक यांच्याविरोधात हवाईसुंदरीची तक्रार, २००९ मध्ये एन.डी तिवारी यांनाही आक्षेपार्ह चित्रफीतीमुळे राज्यपालपदाचा राजीनामा द्यायला लागला होता.