बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या वापरातील नियम बदलले, खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : देशभरातील पायाभूत प्रकल्पांसाठी लागणारी यंत्रसामुग्री कोल्हापुरातून पुरविली जाते. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी व आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर : देशभरातील पायाभूत प्रकल्पांसाठी लागणारी यंत्रसामुग्री कोल्हापुरातून पुरविली जाते. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी व आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा अर्थमुव्हर्स असोसिएशनने खासदार संजय मडलिक यांची भेट घेवून निवेदन दिले होते. खासदार संजय मंडलिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय परिवहन व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मोटर वाहन कायदा १९८९ मध्ये सुधारणा करुन अशा वाहनांची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्याने खा.मंडलिक यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे आणि हा सुधारीत कायदा सपुर्ण देशभर लागू करण्यात  आला आहे, त्यामुळे देशभरातील अवजड वाहनधारक व अवजड यंत्रसामुग्री पुरविणारे ठेकेदारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

बांधकामासाठी उपयोगात आणले जाणाऱ्या ट्रेलर व तत्सम वाहनातून नेल्या जाणाऱ्या मालाला उंचीची मर्यादा ३.६ मीटर (११ फूट) होती. मात्र इतर मालवाहतूक वाहनांपेक्षा उंचीला ही वाहने १ फूटापेक्षा जास्त असतात. त्यांची मानके आंतरराष्ट्रीय नियमानुसार ठरलेली असतात.अशा वाहनांमध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत. त्यामुळे अशा वाहनातून अवजड यंत्रसामुग्री वाहतूक करताना गेल्या कित्येक दशकापासून कोट्यवधी रुपयांचा दंड भरावा लागत होता. याशिवाय हा दंड भरेपर्यंत वाहन थांबवून ठेवले जात होते.पर्यायाने वाहन, वाहनचालक, त्यावरील यंत्रसामुग्रीचा मोठा खोळंबा होत होता आणि याचा वाहन मालकांना मोठा आर्थिक  भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी केंद्रीय परिवहन व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करुन व संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली व या मोटर वाहन कायद्यामध्ये तांत्रिक बदल करण्यासाठीची विनंती केली. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मंत्री गडकरी  यांनी  अत्यंत गांभीर्याने विचार करुन मोटर वाहन कायदा १९८९ मध्ये सुधारणा करुन ट्रेलर व बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची उंची ३.६ मीटर वरुन ४.७५ मीटर (१४ फूट) केली. या निर्णयामुळे देशभरातील सर्व अवजड यंत्रसामुग्रीची वाहतूक करणारी वाहने या सुधारीत कायद्याच्या मर्यादेत आल्याने मोटर वाहन मालकांचा दंड भरण्याचा त्रास व वेळ दोन्हींची बचत होणार आहे. त्यामुळे, देशभरातील वाहनधारकांमध्ये व अवजड यंत्रसामुग्री पुरविणारे ठेकेदारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

आज कोल्हापूर अर्थमुव्हींग असोसिएशने खासदार संजय मंडलिक यांची भेट घेवून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल व त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आभार मानले. यावेळी अर्थमुव्हींग असोसिएशन अध्यक्ष रविंद्र पाटील सडोलीकर, सचिव अभय देशपांडे, प्रताप कोंडेकर, श्रीकांत घाडगे, सेवानिवृत्त प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी रविंद्र भागवत, , पै.राजाराम मगदूम, महेश धनवडे, संजय कसबेकर, संजय नाळे, अमोल पाटील, श्रीकांत घाडगे, संजय शंकरराव पाटील (शिरोलीकर), दिपक नलवडे, रंगराव आर. पाटील, अभय देशपांडे, ॲड.सुरेश कुराडे, विज्ञान मुंडे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.