बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यासाठी छात्र भारतीचे ‘डिग्री जलाओ’ आंदोलन

नाशिक: सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी छात्रभारती(chatra bharti) संघटनेच्या वतीने आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘डिग्री जलाओ’ आंदोलन करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता गोल्फ क्लब मैदानात प्रतिकात्मक स्वरूपात हे ‘डिग्री जलाओ आंदोलन(protest) करण्यात आले. बेरोजगारांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

छात्रभारतीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बेरोजगारांविषयी सरकारकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे उच्च शिक्षित बेरोजगारांमध्ये असंतोष आहे. आजच्या आंदोलनात राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सगळ्या संघटना, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.