sambhaji raje

मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (SC) स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात मराठा आरक्षण हा मुख्यत्वे ठाकरे सरकारचा विषय आहे. यामध्ये केंद्र सरकारची मदत लागली आणि घटना बदलण्याचाही विषय असेल तर त्याबाबतही माझा अभ्यास सुरु आहे. असं वक्तव्य खासदार संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) केलं आहे.

विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटनेत बदल करायचा असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटनेत बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने मदत करावी. मी छत्रपती या नात्याने रयतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वय साधणार आहे, मात्र मदत मिळाली पाहिजे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.