Uddhav Thackeray

बीड : सहकार क्षेत्रात नावाजलेली कराड जनता सहकारी बॅकेचा बॅकींग परवाना रिझर्व्ह बॅकेने  रद्द केला. सहकार आयुक्तांनी बॅकेची दिवाळखोरी जाहीर केली. याबाबत आदेश प्राप्त झाल्याने ठेवीदार, सभासदामध्ये खळबळ उडाली. तर दुसरीकडे आता मैत्रेय फंड पैसे गोळा केलेल्या ठेवीदारांनी अद्याप रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दारात येऊन सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

बीड : सहकार क्षेत्रात नावाजलेली कराड जनता सहकारी बॅकेचा बॅकींग परवाना रिझर्व्ह बॅकेने  रद्द केला. सहकार आयुक्तांनी बॅकेची दिवाळखोरी जाहीर केली. याबाबत आदेश प्राप्त झाल्याने ठेवीदार, सभासदामध्ये खळबळ उडाली. तर दुसरीकडे आता मैत्रेय फंड पैसे गोळा केलेल्या ठेवीदारांनी अद्याप रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दारात येऊन सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

राज्यासह देशभरातील सुमारे २० लाख ठेवीदारांकडून २१०० कोटींची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात बीड जिल्ह्यातील २५ ते ३० हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. जास्ती व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. एकट्या बीड शहरात ४० कोटी रुपये गुंतवणूक केली आहे असे पीडित गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, मैत्रेय कंपनीला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती ,यांचे फोटो अभिप्राय, पुरस्कार दाखवून ठेवी गोळा केल्याचे गुंतवणूक करणाऱ्या महिलांनी सांगितलं.

‘लोकं दारात येऊन आत्महत्या करण्याच्या धमक्या देत आहेत आणि त्यांचे पैसे द्यायचे आहे, या कंपनीने लोकांकडून घेतलेले पैस परत न दिल्यानं अनेक लोकांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.तसेच आतापर्यंत शहरात पैसे बुडाल्यामुळे काही जणांनी आत्महत्या देखील केली असल्याचंही काही महिला ठेवीदारांनी सांगितले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या ठेवीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात येऊन एकत्रित आत्मदहन करू, असा इशारा देखील या महिलांनी दिला आहे.

काय आहे वादग्रस्त मैत्रेय फंड प्रकरण

मधुसूधन सत्पाळकर यांनी १९९८ मध्ये मैत्रेय सर्व्हिसेस नावाची कंपनी विरार येथे स्थापन केली. सत्पाळकर हे चेअरमन तथा कार्यकारी संचालक होते. तर पत्नी वर्षा सत्पाळकर या संचालक होत्या. २००४ मध्ये मधुसूदन सत्पाळकर यांचे निधन झाले. त्यामुळे या कंपनीचा पदभार पत्नी वर्षा यांनी सांभाळला. भाऊ जनार्दन परूळेकर यालाही त्यांनी संचालक केले. ही कंपनी स्थापन करण्यापूर्वी मधुसूदन सत्पाळकर हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. २००८ मध्ये मैत्रेय कंपनी बंद पडली. त्यानंतर वर्षा सत्पाळकर व परूळेकर यांनी मैत्रेय प्लॉटर्स व स्ट्रक्चर्स नावाने दुसरी कंपनी स्थापन केली. नंतर २०१३‌ मध्ये ही कंपनीही बंद झाली. या कंपनीत लोकांचे अडकलेले पैसे परत करण्यासाठी वर्षा सत्पाळकर यांनी पुन्हा मैत्रेय रिएल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन या नावाने तिसरी कंपनी स्थापन केली. त्यात परूळेकर यांच्याऐवजी सत्पाळकर यांनी अजित पाठारे व ज्ञानेश्वर वैद्य (दोन्ही रा.विरार) या दोघांना संचालक बनविले. ही कंपनी सुरू असतानाच यासारखीच बंगळूरू येथे २०१५-१६ मध्ये सुवर्णसिध्दी नावाची चौथी कंपनी सुरू केली. मात्र, या कंपनीने लोकांकडून घेतलेले पैस परत न दिल्यानं अनेक लोकांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.

वर्षा मुधूसुदन सत्पाळकर यांनी स्थापन केलेल्या मैत्रेय समुहाने १२ वर्षात हॉटेल, रिसॉटस्, गृहप्रवेश उभारून तसेच दरम्यान, मैत्रेय कंपनीला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे राज्यातील हजारो गुंतवणूकदार/ठेवीदार आकर्षित झाले, केले गेले. २०१५ पूर्वी मैत्रेयने ग्राहकांच्या ठेवी वेळेच्या वेळी चोख करत केल्या. परंतु, जुलै २०१५ नंतर कंपनीने परतावा दोन महिने उशिरा देणे सुरू केले. त्यानंतर मात्र, त्यांच्या गुंतवणूकीचा परतावा न देता त्यांना हजारों कोटींचा गंडा घातला.