मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या धाकट्या मुलाने शोधली पालीची नवीन प्रजाती

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला आहे. त्यांचे मागील पाच वर्ष पालीवर संशोधन सुरु होते. त्याच अभ्यासावरून त्यांनी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव  तेजस ठाकरे यांनी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला आहे. त्यांचे मागील पाच वर्ष पालीवर  संशोधन सुरु होते. त्याच अभ्यासावरून त्यांनी पालीच्या दुर्मिळ प्रजाती शोधल्या आहेत. तेजस आणि इतर तीन जणांच्या टीमने कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात पालींच्या या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. 

पाच वर्षांपासून सुरु होते संशोधन 

तेजस ठाकरे, सौनक पाल, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल या चार संशोधकांच्या टीमने २०१४ मध्ये  पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता. या पाली दुर्मिळ का असून त्या इतर पालींपेक्षा  जनुकीय आणि  प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार वेगळ्या कसा आहेत याबाबत अनेक विस्तृत संशोधन सुरु होते. या संशोधनातून  ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’या दुर्मिळ पालीचा शोध लागला आहे.या पालीचे वैशिष्ट्य म्हणजे डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबुळं होय. या त्यांच्या वेगळ्या शरीररचनेमुळे या पाली लक्ष वेधून घेतात. तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमचे पालीबाबतचे शोधनिबंध आंतराराष्ट्रीय स्तरावरच्या “झुटाक्सा” या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे.  

तेजस ठाकरेंनी यापूर्वी खेकडा आणि सापाची नवी प्रजाती शोधली

तेजस ठाकरें यांना वन्यजीवांच्या संशोधनात  रस असून  त्यांनी यापूर्वी देखील  खेकडा  आणि सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध त्यांनी लावण्याने त्या सापाला ‘बोईगा ठाकरे’ असं ठेवण्यात आलं होतं. सापांप्रमाणेच तेजस यांनी सह्याद्रीपर्वत रांगामध्ये खेकड्यांच्या ११ दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. याबाबतचा शोधनिबंध  न्यूझिलंडमधील एका नियतकालिकेमध्ये  प्रसिद्ध झाला आहे.