पंतप्रधानांसोबत झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांचा मंत्रीमंडळ बैठकीत खुलासा, म्हणाले….

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत(Cabinet Meeting) सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेत दिल्ली येथील दौऱ्याबाबत(Chief Minister Delhi Visit) माहिती दिली.

  मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या सोबतची ती बंददाराआडची चर्चा व्यक्तिगत, राजकीय नव्हती, असा सविस्तर खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोलताना केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या भेटीनंतरच्या मुख्यमंत्र्याच्या वक्तव्याने निर्माण झालेले संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

  विश्वासात घेत दिल्ली दौऱ्याबाबत दिली माहिती
  सूत्रांनी सांगितले की, आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत(Cabinet Meeting) सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेत दिल्ली येथील दौऱ्याबाबत माहिती दिली.

  ते म्हणाले की राज्याचे बरेच दिवस प्रलंबित असलेले सर्व प्रश्न मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधानांच्या समोर मांडले. त्यावेळी त्यांच्याशी व्यक्तिगत चर्चा झाली असली तरी त्यात राजकीय चर्चा नसून राज्याच्या विकासाच्या प्रलंबित विषयांवरच चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत संभ्रम निर्माण केला जात असला तरी त्यात तथ्य नाही. मुख्यमंत्र्याच्या खुलाशामुळे तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारबाबतच्या वावड्यांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

  पवारांकडूनही भेटी संदर्भातील संभ्रम दूर
  दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अडचणीच्या काळात शिवसेनेने दिलेला शब्द कधी विसरत नसल्याची बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली होती, त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पंतप्रधानाच्या भेटी संदर्भातील संभ्रम दूर केल्याचे मानले जात आहे.