पावसाळ्यात कोरोना संसर्गाचा जास्त धोका, फॅमिली डॉक्टरकडे मोठी जबाबदारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पावसाळ्यात(Rainy Season) काही रोग व साथी उद्भवतात. त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे(Covid Symptoms) एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविड्ची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच उपचाराकडे लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी सांगितले आहे.

    मुंबई: सर्वसामान्य रुग्ण पहिल्यांदा त्याला कोणताही त्रास झाला की आपल्या फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी जातो, हे लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोविडची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाही अशा वेळी तुमच्यावर योग्य रीतीने अशा रुग्णास ओळखण्याची जबाबदारी आहे. असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते आपण पहीले पाहिजे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे त्याकडेही डॉक्टर्सनी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे. अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) ने आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन करतांना दिल्या.

    पावसाळ्यातील रोग व कोविडची लक्षणे एकसारखी
    पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात. त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविड्ची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होताहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

    प्रास्ताविक महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे यांनी केले तर डॉ अर्चना पाटे यांनी सूत्र संचलन केले. या ऑनलाईन परिषदेसाठी २१ हजार ५०० डॉक्टर्सनी नोंदणी केली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही आपले विचार मांडले.

    टास्क फोर्समधील तज्ञ मार्गदर्शन करणा
    दोन दिवसीय कार्यशाळेत एकूणच कोविड संसर्गाचे बदलते स्वरूप, गृह विलगीकरण रुग्णांवरील उपचार, मुलांमधील संसर्ग, तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन तयारी करणे, कोविड लसीकरण, म्युकरवरील इलाज, कोविड व्यवस्थापनातील मुद्दे, प्रयोगशाळेतील चाचण्या, कोविडनंतरचे आजार अश विविध विषयांवर दोन दिवस ही कार्यशाळा चालणार असून टास्क फोर्समधील तज्ञ तसेच इतरही काही तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.