बळीराजासाठी आनंदाची बातमी, यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात(Rain in Maharashtra) ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले असेल. कमी दिवसात अधिक पाऊस(Rain) पडणार आहे

    महाराष्ट्रातील लोकांसाठी एक आनंदाची बातमी(Good News) आहे. भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख अधिकारी ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रात यंदा पाऊस सरासरीच्या ९९ टक्के((99 Percent Raifall in Maharashtra)होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

    साबळे यांनी सांगितलं आहे की, महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले असेल. कमी दिवसात अधिक पाऊस पडणार आहे. तसेच काही काळ पावसात खंड पडेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

    साबळे पुढे म्हणाले की,विदर्भातही चांगला पाऊस पडेल. पश्चिम विदर्भात ९८ टक्के, मध्य विदर्भात १०२ टक्के, पूर्व विदर्भात १०० टक्के पाऊस पडेल. याशिवाय मराठवाड्यामध्ये ९८ टक्के, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ९८ टक्के, पश्चिम महाराष्ट्रात ९९ टक्के मान्सन बरसेल, असा अंदाज आहे.

    तौक्ते आणि यास चक्रीवादळामुळे मान्सून केरळमध्ये लवकर दाखल झाला. महाराष्ट्रातही लवकरच पाऊस येईल आणि तो समाधानकारक असेल असं हवामान तज्ञांनी सांगितल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.