कांजूर मेट्रो शेड, मराठा आरक्षण आणि मोफत लसीकरणासह मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या विविध मागण्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठा आरक्षणावर सुमारे १ तास ४५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे.

  नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एकूण ११ मागण्या मांडल्या आहेत. ओबीसी, मराठा आणि पदोन्नतीतील आरक्षणासह विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. मोदींनी या मागण्या गंभीरपणे ऐकून घेऊन त्यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठा आरक्षणावर सुमारे १ तास ४५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत.उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.  सर्व विषय मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रंही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले. त्याबाबत मोदींनी लक्ष घालतो असं सांगितलं. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  मुख्यमंत्र्यांनी मांडलेले विषय
  – मराठा आरक्षणाचा विषय आहे
  – दुसरा महत्त्वाचा विषय इतर मागासवर्ग आरक्षणाबाबतचा हा विषय देशपातळीवरचा आहे.
  – मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण
  – चौथा मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय
  -जीएसटीचा विषय, वेळेवर जीएसटी येणे
  – शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न– पीक कर्ज असतं तसं पीक विमा आहे, त्याच्या अटीशर्तीबाबत चर्चा, महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती दिली
  – चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी
  – मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा