केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षा धोरणाला काॅंग्रेसचा विरोध

  • शिक्षा नीती संबंधित अध्यादेशाची होळी

धुळे. (Dhule). राष्ट्रीय शिक्षा धोरण २०२० च्या (National Education Policy-2020) विरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने (Congress Sevadal) देशात जनसेवा शिक्षा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर धुळे जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अलोक रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी (Collector office) कार्यालयाच्या बाहेर नवीन शिक्षा निती संबंधातील अध्यदेशाची होळी करण्यात आली. या नंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यलयात निवेदन देऊन नविन शिक्षा धोरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

या वेळी जिल्हाध्यक्ष अलोक रघुवंशी, शहर अध्यक्ष राजेंद्र खैरनार दिपक पाटील,शिरपुर तालुका अध्यक्ष योगेश जोशी,अय्युब खाटीक, जगदीश चव्हाण,शिवदत्त शुल्क, प्रविण पाटील,महीला अध्यक्षा श्रीमती सुमनताई मराठे, कल्पना गुरव, महिला तालुका अध्यक्षा सुरेखा पाटील, मीना सोनानी यांच्यासह पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.