दोन डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार व्हावा; अजित पवार यांचे मत

    पुणे : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे.

    लसीचे दोन्ही डोस ज्यांना देण्यात आलेले आहेत अशा नागरिकांना टप्याटप्प्याने बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार व्हावा, असे ते म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.

    नागरिकांनी नियमावलीच तंतोतंत पालन करायला पाहिजे. पण, ग्रामीण भागात मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विनामास्क नागरिक फिरत असल्याचे चित्र आहे. एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते, त्यामुळे सर्वानी नियम पाळले पाहिजेत अशी सुचनाही त्यांनी केली.