राज्यात कोरोना मृतांचा आकडा एक हजार पार

- गुरुवारी ४४ जणांचा मृत्यू , १६०२ नवे रुग्ण मुंबई :राज्यातील रूग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारी राज्यातील मृतांची संख्या एक हजार पार पोहचली आहे. राज्यात गुरुवारी ४४ जणांचा मृत्यू

– गुरुवारी ४४ जणांचा मृत्यू , १६०२ नवे रुग्ण 

मुंबई : राज्यातील रूग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारी राज्यातील मृतांची संख्या एक हजार पार पोहचली आहे. राज्यात गुरुवारी ४४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १०१९ वर पोहचली आहे. तसेच गुरुवारी १६०२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. तसेच गुरुवारी ५१२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ६०५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत.

राज्यात ४४ कोरोनाबाधित रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुंबईमधील सर्वाधिक २५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल नवी मुंबईत १4 ,  पुण्यात ५, औरंगाबाद शहरात २, पनवेलमध्ये १ तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीमध्ये झाला आहे. मृतांमध्ये ३१ पुरुष तर १३ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू हे मागील काही दिवसांच्या दरम्यानची नोंद आहे.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,४०,१४५ नमुन्यांपैकी २,१२,६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७,५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,२५३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५९.०४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ३,१५,६८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५,४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

१ मुंबई महानगरपालिका १६७३८ ६२१ 

२ ठाणे १६६ ३ 

३ ठाणे मनपा १२१५ ११ 

४ नवी मुंबई मनपा १११३ १४ 

५ कल्याण डोंबवली मनपा ४२४ ४ 

६ उल्हासनगर मनपा ८२ ० 

७ भिवंडी निजामपूर मनपा ३९ २ 

८ मीरा भाईंदर मनपा २४८ २ 

९ पालघर ४२ २ 

१० वसई विरार मनपा २९५ ११ 

११ रायगड १६६ २ 

१२ पनवेल मनपा १६१ ९ 

ठाणे मंडळ एकूण२०६८९६८१ 

१३ नाशिक ९८ ० 

१४ नाशिक मनपा ६० ० 

१५ मालेगाव मनपा ६४९ ३४ 

१६ अहमदनगर ५५ ३ 

१७ अहमदनगर मनपा १५ ० 

१८ धुळे ९ २ 

१९ धुळे मनपा ६२ ४ 

२० जळगाव १७१ २२ 

२१ जळगाव मनपा ५२ ४ 

२२ नंदूरबार २२ २ 

नाशिक मंडळ एकूण११९३७१ 

२३ पुणे १८२ ५ 

२४ पुणे मनपा २९७७ १६६ 

२५ पिंपरी चिंचवड मनपा १५५ ४ 

२६ सोलापूर ९ १ 

२७ सोलापूर मनपा ३३५ २० 

२८ सातारा १२५ २ 

पुणे मंडळ एकूण३७८३१९८ 

२९ कोल्हापूर १९ १ 

३० कोल्हापूर मनपा ६ ० 

३१ सांगली ३६ ० 

३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७ १ 

३३ सिंधुदुर्ग ७ ० 

३४ रत्नागिरी ८३ ३ 

कोल्हापूर मंडळ एकूण१५८५ 

३५ औरंगाबाद ९५ ० 

३६ औरंगाबाद मनपा ६२१ १९ 

३७ जालना २० ० 

३८ हिंगोली ६१ ० 

३९ परभणी १ १ 

४० परभणी मनपा १ ० 

औरंगाबाद मंडळ एकूण७९९२० 

४१ लातूर ३२ १ 

४२ लातूर मनपा ० ० 

४३ उस्मानाबाद ४ ० 

४४ बीड १ ० 

४५ नांदेड ५ ० 

४६ नांदेड मनपा ५२ ४ 

लातूर मंडळ एकूण९४५ 

४७ अकोला १८ १ 

४८ अकोला मनपा १९० ११ 

४९ अमरावती ५ २ 

५० अमरावती मनपा ८७ ११ 

५१ यवतमाळ ९९ ० 

५२ बुलढाणा २६ १ 

५३ वाशिम ३ ० 

अकोला मंडळ एकूण४२८२६ 

५४ नागपूर २ ० 

५५ नागपूर मनपा ३२९ २ 

५६ वर्धा १ १ 

५७ भंडारा १ ० 

५८ गोंदिया १ ० 

५९ चंद्रपूर १ ० 

६० चंद्रपूर मनपा ४ ० 

६१ गडचिरोली ० ० 

नागपूर एकूण३३९३ 

इतर राज्ये४११० 

एकूण२७५२४१०१९