कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने टाळेबंदीचे निर्बंध टप्प्याटप्प्याने होणार शिथील – वडेट्टीवार यांनी दिले संकेत

विजय वडेट्टीवार(Vijay Vadettiwar) यांनी कोरोना रुग्णांची (Corona Patients)संख्या कमी होत असल्याने टाळेबंदी निर्बंध(Lockdown restrictions) काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने शिथील होण्याचे संकेत दिले आहेत.

  मुंबई: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Vadettiwar) यांनी कोरोना रुग्णांची (Corona Patients)संख्या कमी होत असल्याने टाळेबंदी निर्बंध(Lockdown restrictions) काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने शिथील होण्याचे संकेत दिले आहेत.

  निर्बंध टप्याटप्याने मागे
  एप्रिल- मे महिन्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने एप्रिल मध्यात कडक टाळेबंदी निर्बंध जाहीर करण्यात आले होते.

  सध्या मुंबई-ठाणे, नाशिक, नागपूर नवी मुंबईमधील स्थिती दिलासादायक आहे. त्यामुळे या भागात निर्बंध १ जूनपासून काही प्रमाणात शिथील केले जातील. निर्बंध टप्याटप्याने मागे घेण्याबाबत सूचक विधान राजेश टोपे यांनी देखील केले होते.

  दोन टप्प्यात अनलॉक
  राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उच्च पदस्थांच्या माहितीनुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची तसेच त्यासाठी निश्चित नियमावली आखून परवानगी देण्याची शक्यता आहे.

  अत्यावश्यक सेवा दुकानदारांना सकाळी ७ ते ११पर्यंत दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यात निर्बंध मागे घेण्यात येऊन सायंकाळपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शिवाय दुसऱ्या टप्प्यात सात जून पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, बार व मद्यालय या सेवा सुरु करण्यात येतील.

  त्यानंतर १४ जूनच्या सुमारास चौथ्या टप्प्यात करोना परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार मुंबई लोकलसेवा व धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आला आहेत तेथे रुग्णसंख्या पाहून  जिल्हाबंदी उठवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.