राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी, गेल्या २४ तासांमध्ये ३,०७५ रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ३ हजार ७५ रुग्णांची नोंद(Corona patients In Maharashtra) झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे.

    आज राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या(Maharashtra Corona Update) कमी झाल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ३ हजार ७५ रुग्णांची नोंद(Corona patients In Maharashtra) झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे. दुसरीकडे ३ हजार ५६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २ हजार ८१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण(Recovery Rate) ९७.०५ टक्के आहे. राज्यात दिवसभरात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यात आता ४९ हजार ७९६ सक्रीय रुग्ण आहेत.

    राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५८ लाख ३६ हजार १०७ रुग्णांपैकी ६४ लाख ९४ हजार २५४ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे करोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हे ११.६३ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ७७२ रुग्ण होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर १,९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.