राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट पोहोचला ९१.०६ टक्क्यांवर, दिवसभरात ५१,४५७ जणांनी केली कोरोनावर मात

आज ५१,४५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४९,७८,९३७ कोरोनाबाधित रुग्ण(Corona Patients) बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(Corona Recovery Rate) ९१.०६% एवढे झाले आहे.

    मुंबई : आज राज्यात ३४,०३१ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित(Corona Patients in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या ५४,६७,५३७ झाली आहे. आज ५१,४५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४९,७८,९३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,०१,६९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ५९४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ५९४ मृत्यूंपैकी ३३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१८,७४,३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,६७,५३७ (१७.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,५९,०९५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात १३२९ नवे रुग्ण
    मुंबईत दिवसभरात १३२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६९१३५२ एवढी झाली आहे. तर ५७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४३७३ मृत्यूची नोंद करण्यात आली.