मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, लालबागमधील सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती प्रत्यक्ष जाऊन पाहण्यावर बंदी – ऑनलाईन दर्शनाची सोय

कोरोनाचा प्रादुर्भाव(Action For Stopping Corona Spread) वाढू नये म्हणून मुंबईतील लालबाग(Lalbaug) परिसरात गणेशभक्तांना गणेश मंडळांचा गणपती पाहण्यासाठी येऊ देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. लालबागमधील सर्व गणेश मंडळांची मुंबई पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक इत्यादी गणपतींचे आता ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे.

    मुंबई: गणेशोत्सव(Ganeshtosav 2021) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी तरी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी बसवलेले गणपती पाहता येतील, अशी अपेक्षा मुंबईकरांना(Mumbai) होती. मात्र मुंबईत गणेश भक्तांना लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती(Corona Restrictions For Ganeshotsav) पाहता येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने गणेश मंडळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबईतील लालबाग परिसरात गणेशभक्तांना गणेश मंडळांचे गणपती पाहण्यासाठी येऊ देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. लालबागमधील सर्व गणेश मंडळांची मुंबई पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक इत्यादी गणपतींचे आता ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे.

    कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी लालबागमध्ये सर्वात जास्त गर्दी होत असते.त्यामुळे शासनाने लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहता येणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र ऑनलाईन दर्शनाची सोय मंडळांकडून करण्यात आली आहे.