राज्यात २९४० नवे रुग्ण – ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबई : राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५,१६८ झाली आहे. तर रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. तसेच राज्यात आज

मुंबई : राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५,१६८ झाली आहे. तर रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. तसेच राज्यात आज ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या २१९७ वर पोहोचली आहे. आज १,०८४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत २८,०८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात या आठवड्यात रुग्ण दुपटीचा वेग जरी कमी झाला असला तरी शनिवारी राज्यात २९४० रुग्ण सापडले असून ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबई -५४, वसई विरार -७, पनवेल ७, ठाणे – ६, रायगड – ३ ,नवी मुंबई -२, कल्याण डोंबवली -२, जळगाव -३, पुणे -६, सोलापूर -६, नागपूर १, इतर राज्ये २ राजस्थान येथील एक मृत्यू पनवेल मध्ये तर बिहार येथील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.  मृतांमध्ये ६२ पुरुष तर ३७ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ९९ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. नोंद झालेल्या मृत्यूपैकी ४० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ६ मे ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५९ मृत्यूंपैकी मुंबई – ३५, पनवेल – ७, ठाणे – ६, वसई विरार – ६, नवी मुंबई – २, कल्याण डोंबिवली -१ जळगाव- १ तर १ मृत्यू इतर राज्यातील आहे . 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,३३,५५७ नमुन्यांपैकी ६५,१६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३१६९ झोन क्रियाशील असून आज एकूण १७,९१७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६८.५१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,५१,६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५,४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.