राज्यात २७३९ नवे रुग्ण, १२० जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज २७३९ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८२ हजार ९६८ वर पोहोचली आहे.शनिवारी राज्यात १२० जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांचा आकडा २९६९

 मुंबई : राज्यात आज २७३९ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८२ हजार ९६८ वर पोहोचली आहे.शनिवारी राज्यात १२० जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांचा आकडा २९६९ वर पोहोचला आहे.  तसेच २२३४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने राज्यात आजपर्यंत ३७ हजार ३९० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली आहे. त्यामध्ये मुंबईत ५८, ठाणे  १०, नवी मुंबई ६, उल्हासनगर ६, मीरा भाईंदर ५ वसई विरार १, भिवंडी ३,पालघर १, नाशिक ५, मालेगाव २, पुणे १०, सातारा ५, सोलापूर २, औरंगाबाद मनपा २, अकोला मनपा  २, अमरावती २ अशी आहे.मृत्यूंपैकी ७८ पुरुष तर ४२ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५३ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २० जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ( ५७.५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ३ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९० मृत्यूंपैकी मुंबई ५३, मीरा भाईंदर ५, भिवंडी ३,ठाणे ९, उल्हासनगर ६,नवी मुंबई ६, सातारा २, वसई विरार १, अमरावती १, औरंगाबाद १, मालेगाव १, नाशिक १ , सोलापूर १ असे मृत्यू आहेत. कोविड -१९ निदानासाठी सध्या राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

 आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,३७,१२४ नमुन्यांपैकी ८२,९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६०३ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,४२२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.८२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,४६,५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९,०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.