आज राज्यात ११ जणांचा मृत्यू , नव्या ३२८ रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३६४८ वर

मुंबई : आज राज्यात ३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत.

 मुंबई : आज राज्यात ३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आज राज्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर  ३६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११* झाली आहे. ( * या पूर्वी ११ एप्रिल रोजी कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने हा मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे. ) आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई  येथील ५ आणि पुणे येथील ४  तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष तर ५  महिला आहेत. त्यामध्ये  ६० वर्षे किंवा त्यावरील  ५ रुग्ण आहेत तर ६  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत.  मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये ( ८२ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या   ३४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५९९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी  २३ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.