Cyclone 'Tokte' moving towards Mumbai and Gujarat; What is the situation in other states of the country? : Read live update nrdm | चक्रीवादळामुळे ६ मृत्यू, ९ जण जखमी, २५४२ पेक्षा जास्त घरांची पडझड – वाचा लाईव्ह अपडेट | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट29 दिन पहले

चक्रीवादळामुळे ६ मृत्यू, ९ जण जखमी, २५४२ पेक्षा जास्त घरांची पडझड – वाचा लाईव्ह अपडेट

ऑटो अपडेट
द्वारा- Dnyaneshwar More
कंटेन्ट रायटर
16:26 PMMay 17, 2021

तौत्के चक्रीवादळ पोरबंदरपासून अवघ्या १५० किमी अंतरावर

अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के वादळ आता गुजरातच्या दिशेने जात असून, ते पोरबंदच्या १५० किमी अंतारवर पोहचले आहे. राजस्थानपर्यंत या चक्रीवादळाचा धोका सांगण्यात येतो आहे. आज रात्री १० वाजेपर्यंत ते गुजरातच्या किनाऱ्यांवर धडकेल असे सांगण्यात येते आहे. त्यानंतर पोरबंदरहून ते भावनगरमार्गे राजस्थानमध्ये शिरणार असल्याचे सांगण्यात येते आहे. सध्या या चक्रीवादळाची गती ताशी १७५ किमी असल्याचे सांगण्यात येते आहे.

सध्या हे चक्रीवादळ पालघर आणि वापीपासून १५० किमी अंतरावरुन जात आहे. चक्रीवादळामुळे सुटलेल्या वाऱ्याचा वेग ताशी १६५ किमी असल्याचे सांगण्यात येते आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. चक्रीवादळाचे मुख्य केंद्र ताशी १३ ते १४ किमी वेगाने पोरबंदरकडे सरकत आहे.

चक्रीवादळाच्या प्रवासात सर्वाधिक पाऊस हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग गोव्यात नोंदवण्यात आला आहे. किनारपट्टी पररिसरात ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहत आहेत. तटावर चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते आहे. मंगळवारी दिवसभर या वादळामुळे गुजरातमध्ये पाऊस बरसतो आहे.  राजस्थानला पोहचेपर्यंत वादळाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. १८ मे नंतर कमी दबावाने हे वादळ राजस्थानातून हिमालयाकडे सरकरण्याची शक्यता आहे.

15:41 PMMay 17, 2021

पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी १२० किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

15:39 PMMay 17, 2021

हे सुद्धा वाचा

15:24 PMMay 17, 2021

Load More

नवी दिल्ली : केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनाऱ्यालगतच्या परिसरांत रविवारी धुमाकूळ घातल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढं सरकत आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. कोकणातही याचे पडसाद पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी समुद्राचं पाणीही गावांत आल्याचं पाहायला मिळालं. या घटनांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

अनेक नागरिकांचं स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आलं. हे चक्रीवादळ आता हळूहळू गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत आहे. सध्या चक्रीवादळ मुंबईपासून जवळपास 200 किलोमीटर आणि गुजरातपासून 400 किलोमीटर दूर आहे. पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केलं जातं आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे.

रायगड समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण

‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत  7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496,  श्रीवर्धन- 1158.  या एकूण  7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
१६ बुधवार
बुधवार, जून १६, २०२१

कपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.