dahihandi

काेराेनाचे निर्बंध झुंगारून दहिहंडी उत्सव(Dahihandi Celebration In Mumbai) साजरा करण्यासाठी भाजपा(BJP And MNS Govinda Teams) तसेच मनसेची काही गाेविंदा पथके सज्ज झाली आहेत.

    मुंबई: काेराेनाच्या निर्बंधांमुळे(Corona Restrictions) सार्वजनिक उत्सवांना राज्य शासनाने बंदी घातली आहे. मात्र काेराेनाचे निर्बंध झुंगारून दहिहंडी उत्सव(Dahihandi Celebration In Mumbai) साजरा करण्यासाठी भाजपा(BJP And MNS Govinda Teams) तसेच मनसेची काही गाेविंदा पथके सज्ज झाली आहेत. त्यामुळे उद्या मंगळवारी मुंबईत दहिहंड्या फुटणार आहेत. पाेलिसांनी प्रतिबंध केल्यास ठिकठिकाणी संघर्ष हाेण्याची शक्यता आहे.

    गेल्या वर्षीही दहिहंडीचा उत्सव काेराेनामुळे साजरा झाला नाही. यंदाही काेराेनाच्या तिसर्या लाटेची भिती असल्याने सार्वजनिक उत्सव साजरे करू नये यासाठी यासाठी राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. मात्र हे निर्बंध झुंगारून भाजप आणि मनसेने दहिहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहेत. भाजपचे आमदार राम कदम यांना दहिहंडीच्या दिवशी गर्दी हाेणार असल्याने उत्सव साजरा करण्यावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे उद्या ते सकाळी साडेनऊ वाजता घाटकाेपर पाेलिस ठाण्यात दाखल हाेणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारचे निर्बंध झुंगारून दहिहंडी साजरी करण्याचा इशारा दिला आहे. उद्या ते ठाण्याला जाणार आहेत. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ट्विट करत दहीहंडी यंदा साजरी होणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी राहील. सरकारला फक्त मराठी सणांमध्येच कोविड दिसतोय असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना पाेलीसांनी अटक केल्याचे समजते. त्यांना पाठिबा देण्यासाठी मनसेचे देशपांडे उद्या ठाण्याला जाणार असल्याचे समजते. मनसे आणि भाजपची काही गाेविंदा पथके उद्या शासनाचे निर्बंध माेडून दहिहंड साजरी करण्यावर ठाण आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनाही पाेलीसांनी नाेटीस पाठविली असल्याचे मनसेच्या सुत्रांनी सांगितले.

    मुंबईत सुमारे १० ते ११ हजार सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळे आहेत. साधारणपणे तितकीच दहिहंडी उत्सव मंडळे आहेत. त्यामुळे गणेशाेत्सवा इतकाच दहिहंडी उत्सव मुंबई, ठाण्यात जल्लाेषात साजरा केला जाताे. ५ लाखाहून ५० लाखापर्यंतच्या बक्षिसांची लयलूट हाेते. सेलिब्रेटींची उपस्थिती, गाणी, डांस अशी रेलचेल माेठ्या दहिहंडी उत्सवात दिसत हाेती. या उत्सवारच आता काेराेनामुळे विरजण पडले आहे. गेल्या वर्षी गाेविंदा पथकांनी उत्स्फूर्तपणे उत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी दर्शविली. यंदाही काही गाेविंदा पथकांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सण-उत्सवातली गर्दी टाळण्याच्या केंद्र सरकारने सूचना केल्या आहेत. तरीही भाजप आणि मनसे दहिहंडी साजरी करण्यावर ठाम असल्याचं चित्र दिसून येत आहे. ठाण्यात मनसेची दहीहंडी उत्सवाची तयारी देखील सुरु झाली आहे. तर दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावरुन मनसे पदाधिकारी, गोविंदा पथकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.