महिन्याभरात राज्यातील मृत्यूदरामध्ये ०.४० टक्क्यांची घट, सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावरून आला सहाव्या स्थानावर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave)सर्वाधिक फटका महाराष्ट्राला(Maharashtra) बसला. गेल्या तीन महिन्यात झपाट्याने रुग्णवाढ झाल्याने मृतांचा आकडा ही वाढला होता. पर्यायाने राज्यातील मृत्यूदर(Death Rate in Maharashtra) वाढून १.९२ च्या वर गेला. त्यामुळे चिंतेत भर पडली.

  मुंबई :गेल्या महिन्याभरात राज्यातील मृत्यूदरात (Death Rate)घट झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्यातील मृत्यूदर ०.४० टक्क्यांनी कमी झाला असून त्यामुळे सर्वाधिक मृत्यूदर असणाऱ्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र(Death rate in Maharashtra) तिसऱ्या स्थानावरून सहाव्या स्थानापर्यंत खाली आला आहे.

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. गेल्या तीन महिन्यात झपाट्याने रुग्णवाढ झाल्याने मृतांचा आकडा ही वाढला होता. पर्यायाने राज्यातील मृत्यूदर वाढून १.९२ च्या वर गेला. त्यामुळे चिंतेत भर पडली.

  एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील मृत्यूदर हा १.९२ % इतका होता. त्यामुळे देशातील सर्वाधिक मृत्यूदर असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर होते. महाराष्ट्रापेक्षा अधिक मृत्यूदर हा पंजाब २.८५ % तर सिक्कीम २.१६ % होता.

  एप्रिल महिन्याच्या शेवटी राज्यातील मृत्युदर हा कमी होऊन १.४९ %पर्यंत खाली आला. त्यावेळी महाराष्ट्र चौथ्या स्थानावर होते. महाराष्ट्रापेक्षा अधिक मृत्युदर असणाऱ्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेशची भर पडली होती.

  गेल्या महिन्याभरात राज्यातील मृत्यूदर ०.४० % नी कमी झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर हा १.६२ % इतका आहे. सध्या महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर असून पंजाब,उत्तराखंड,दिल्ली,गोवा,सिक्कीम या राज्यातील मृत्युदर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे.

  राज्यात दररोज सरासरी ४५० मृत्यूंची नोंद होत असून मृतांचा आकड़ा दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्यात आतापर्यंत ९४,८४४ इतक्या मृत्यूची नोंद झाली आहे.