मच्छिमारांसह,पडलेली घरे आणि फळबागांच्या नुकसानीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा,देवेंद्र फडणवीस यांची मागणी

ज्यांची घरे पडली आहेत, फळबागांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज(package for cyclone affected) जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी केली आहे.

    अलिबाग: शासनाने लवकरात लवकर मदत करावी. रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक  मदत सरकारने जाहीर करावी. मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या बोटीचे देखील नुकसान झाले आहे. ज्यांची घरे पडली आहेत, फळबागांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज(package for cyclone affected) जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी केली आहे.

    नुकसानीचा आढावा
    विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तीन दिवसांच्या कोकण दौऱ्याची सुरूवात रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून रायगड जिल्ह्यातील वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर फडणवीस यांनी अलिबाग येथील कोळीवाडा येथे भेट देऊन मच्छीमारांनी संवाद साधला.तसेच नुकसान किती झाली याची माहिती घेतली. यावेळी विरोधी विधान परिषद नेते  प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर, महेश बालदी व इतर अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

    अलिबाग तालुक्यातील खानाव उसळे येथील पिण्याच्या पाण्याची पडलेली टाकीची पाहणी केली. तसेच वावे या गावातील जमीनदोस्त झालेल्या घराची पाहणी देखील यावेळी फडणवीस यांनी केली.