Devendra Fadanvis and sharad pawar meeting

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट(Devendra Fadanvis Met Sharad Pawar) घेतली आहे.

    राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट(Devendra Fadanvis Met Sharad Pawar) घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. “माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

    महाराष्ट्रात ओबीसींसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेलं नाही, असं सांगत फडणवीस यांनी आरक्षण कशाप्रकारे घालवलं हे समोर ठेवायचं असल्याचं सांगितलं. आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.