Devendra-Fadvanis

धनंजय मुंडे(dhanajay munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.”

मुंबई : धनंजय मुंडे(dhanajay munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, नाशिकमध्ये स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी न्यायालयात गेल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावे. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर काढले की, आम्ही आमची मागणी करु”.

यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचं संभाजीनगर केले. खरे तर त्यांच्याकडे अधिकार आहे. ते अधिकार पदावर आहेत. त्यांनी ट्विटरवर असे काही टाकण्यापेक्षा प्रस्ताव मंजूर करून निर्णय घ्यावा. हे म्हणजे डुप्लिकेट काम झाले, असा चिमटा काढतानाच औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेची मिलीजुली कुस्ती सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.