jitendra awhad

रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालावर विरोधकांनी टीका केली आहे. “हा अहवाल सीताराम कुंटेंनी तयार केलाच नसेल, तो जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा”, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर आव्हाड यांनी फडणवीसांना आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रत्युत्तर दिलं.

    राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला आहे. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचा यामागील हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.सिताराम कुंटे यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा या वाक्यातून अपमान झाला आहे. एकंदर पोलीस खात्यातील अधिकारी व प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचं मनोबल खच्चीकरण करण्याच कामच जणू विरोधी पक्षाकडून सुरु आहे.पण याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. कि जितेंद्र आव्हाड अहवाल लिहू शकतात. एवढं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले तेच खुप झालं., अशा शब्दात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

     

    नेमकं घडलं काय ?
    रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालावर विरोधकांनी टीका केली आहे. “हा अहवाल सीताराम कुंटेंनी तयार केलाच नसेल, तो जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा”, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर आव्हाड यांनी फडणवीसांना आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रत्युत्तर दिलं.

    कुंटेंची तर केवळ सही!”

    “सीताराम कुंटेंनी दाखल केलेला रिपोर्ट ते तयार करतील असं मला वाटत नाही. हा रिपोर्ट आव्हाड किंवा मलिक यांनी तयार केला आणि कुंटेंनी त्यावर फक्त सही केली आहे”, असं फडणवीस म्हणाले होते.