dhananjay munde

बलात्काराच्या गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडेंच्या(dhananjay munde) राजीनाम्याची(resignation) मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत.

बलात्काराच्या गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडेंच्या(dhananjay munde) राजीनाम्याची(resignation) मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. पक्ष कार्यालयात अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे पोहोचले आहेत. त्यानंतर त्यांनी आपले मत मांडले.

धनंजय मुंडे यांनी सांगितलं की, “मी स्वत: शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांना भेटलो आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. माझं मत आधीच मी प्रसार माध्यमांना प्रेस नोटद्वारे कळवलं आहे. धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करुन निर्णय घेतील”.

याआधी शरद पवारांनी तक्रार गंभीर स्वरुपाची असून योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावलं उचलली जातील असं पवार म्हणाले.