Eknath Khadase
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे

  • माजी मंत्री खडसेंचा गौप्यस्फोट

मुक्ताईनगर : गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून राजकारणात असून या काळात आपल्यावर भ्रष्टाचाराचा विरोधकांनी आरोप केला नाही मात्र भाजपा मंत्री पदाच्या काळात माझ्यावर आरोप करण्यात आले व माझा राजीनामा घेण्यात आला मात्र हा राजीनामा आपण स्वतःहून दिला नाही तर मी कोर्‍या कागदावर स्वाक्षरी केली, असा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी केला. माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे आहेत, ती समोर आली तर हादरा बसेल, असा दावादेखील त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

कालच खडसें आमचे नेते आहेत, त्यांच्यावर काही बोलणार नाही, असे सांगत मी घरातील भांडी रस्त्यावर धुत नाही, असे माजी मुख्यमंत्री फडवणीस यांनी सांगून खडसेंना टोला लगावला होता तर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, असे फडणवीस यांनी सांगितले होते. यावरही खडसे यांनी देवेंद्र फडणवीस हे चांगले ड्रायक्लिनर असल्याचा पुनरुच्चार केला होता. परत शनिवारी खडसेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केल्याने राज्याच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.