वाशिममध्ये ३६ व्यक्तींना सुट्टी

  • जिल्ह्यात आणखी २९ कोरोना बाधित

वाशिम. तालुक्यातील झाकलवाडी येथील १, कारंजा लाड शहरातील हयातनगर येथील १, माळीपुरा येथील १, कामरगाव येथील ३, मोरंबी येथील १, सोहळ येथील २, पीएनसी कॅम्प आखातवाडा येथील ५, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ९, शिरसाळा येथील ८, रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील २, गोहगाव हाडे येथील १, मंगरूळपीर शहरातील पोस्ट ऑफिस रोड परिसरातील १, शेगी येथील १ व्यक्तीला आज सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात आणखी २९ कोरोना बाधित
गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार वाशिम शहरातील टिळक चैक परिसरातील १, लाखाळा परिसरातील २, इंगोले नगर परिसरातील १, जुने बाहेती हॉस्पिटलजवळील परिसरातील १, बाकलीवाल कॉलनी परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १, अनसिंग येथील २, वारा जहांगीर येथील ४, बाभूळगाव येथील २, पार्डी आसरा येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४, शिवाजी नगर परिसरातील २, पोहा येथील १, पारवा येथील १, मानोरा तालुक्यातील वापटा येथील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, आसेगाव पेन येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.