तुम्हाला लॉकडाउन हवे की नको? ; मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा निर्णय सोपविला जनतेवर !

राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी समाज माध्यमांवरून थेट संवाद साधला. येत्या आठ दिवसांत जनतेने स्वत:ला या निर्बंधामध्ये राहून शिस्त लावली नाही तर मात्र टाळेबंदीचा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा अल्टिमेंटम त्यांनी दिला.लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले

    राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.
     
     रुग्णवाढीचा वेग चिंताजनक

    यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण गेल्या आठ दिवसांत वाढल्याने तो चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क वापरणे अंतर राखणे आणि निर्बंधाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. येत्या आठ दिवसांत जनतेने स्वत:ला या निर्बंधामध्ये राहून शिस्त लावली नाही तर मात्र टाळेबंदीचा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाशी मागील वर्षी मार्च महिन्यापासून सुमारे आठ ते दहा महिने आपण निकराचा लढा दिला. त्यात धिराने पुढे जात विकासाच्या कामांसाठी हळू हळू निर्बंध शिथील करण्याचा प्रयत्न देखील केला  मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरूवात केल्याचे अकडेवारीवरून दिसत आहे. लोकल सेवा मंदीरे गर्दीच्या बाजारपेठा सारे खुले झाले. समारंभ आंदोलने सोहळे देखील सुरू झाले मात्र लोकंना सामाजिक भान आणि जाणिव राहिली नाही. त्यातून शिस्त पाळण्यास कुचराई झाल्याने कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत.