ashish shelar

सावंतवाडी:  मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त असले पाहिजेत, ही मुंबईच्या विभाजनाची जी मागणी केली आहे, त्याला शिवसेनेची मूक सहमती आहे काय? नसेल तर काँग्रेसला खडे बोल सुनवा, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घालून सत्तेतून बाहेर काढा, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

सावंतवाडी:  मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त असले पाहिजेत, ही मुंबईच्या विभाजनाची जी मागणी केली आहे, त्याला शिवसेनेची मूक सहमती आहे काय? नसेल तर काँग्रेसला खडे बोल सुनवा, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घालून सत्तेतून बाहेर काढा, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

आमदार आशिष शेलार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून ग्रामपंचायत निवडणूक तयारी प्रचार याबाबत पक्षाच्या यंत्रणेचा आढावा घेत आहेत. आज त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील दांडेली, तळवडे, इन्सुली, मळगाव या ग्रामपंचायत हद्दीत जाऊन तेथील भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व प्रचार कार्याचा आढावा घेतला. सोबत जिल्हा अध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधून त्यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यात येत असून राज्याच्या नेतृत्वाने दिलेल्या सूचनांप्रमाणे एकूणच प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आज मी दौऱ्यावर आलो आहे. बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायतीचा आकडा पाहता कोकणातून भाजपला प्रचंड मोठे यश मिळेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षा कमी केल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार आशिष शेलार म्हणाले की,  पोलीसांनी जनतेची सुरक्षा केली पाहिजे, जास्त पोलीस जनतेसाठी उपलब्ध असले पाहिजे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध नाही. पण ज्यांची सुरक्षा कमी केली त्यामध्ये भाजपाच्या नेत्यांचीच नावे जास्त आहेत. त्यावरून राजकीय हेतूने निर्णय घेतल्याचे दिसून येते आहे. कोकणचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा कँटेगरी कमी केली जाते आणि दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांना सुरक्षेचा कँटेगरी वाढवली जाते यावरून सुडबुद्धीचे राजकारण कसे सुरू आहे हे स्पष्ट होते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे वागणूक दिल्याचे देशभरात कुठेही पाहायला मिळणार नाही, हे चित्र महाराष्ट्रातील दुर्दैवी चित्र आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबईच्या विभाजनाला शिवसेनेची सहमती आहे काय?आम्ही त्याला कडाडून विरोध करणार. मुंबई महापालिका कायद्यानुकसान पालिकेच्या प्रशासनाची सध्या असलेली रचना योग्य आहे. आम्हाला विभाजन, त्रिभाजन मान्य नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेसच्या मागणीला शिवसेनेची मुकसहमती आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला