विसरू नको रे आई बापाला …. उलट्या काळजाच्या मुलांनी २०० आईवडीलांना सोडलं रस्त्यावर

वृद्ध आई – वडिलांना पोटच्या मुलांकडूनच वाऱ्यावर सोडले जाण्याचे प्रकार समाजात वाढताना दिसत आहेत, आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट केले त्याच मुलांकडून वृद्धापकाळात जन्मदात्यांची प्रतारणा केली जात आहे.

वृद्ध आई – वडिलांना पोटच्या मुलांकडूनच वाऱ्यावर सोडले जाण्याचे प्रकार समाजात वाढताना दिसत आहेत, आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट केले त्याच मुलांकडून वृद्धापकाळात जन्मदात्यांची प्रतारणा केली जात आहे. औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल तर सोडून दिलेल्या आईवडिलांचं वृद्धाश्रम झालंय.जवळपास २०० आईवडीलांना मुलांनी मरण्य़ासाठी वाऱ्यावर सोडलं आहे. औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलच्या आवारात फिरणाऱ्या एका आजींना त्यांचं नावही आठवत नाहीय. आजींना त्यांच्या मुलानं उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आजी बऱ्या झाल्या पण मुलगा परत आला नाही. हॉस्पिटलच्या आवारात अशा फिरणाऱ्या आजी एकट्या नाहीत.

ग्रामीण भागातील आईवडिलांना सोडून देण्याचे प्रमाण अधिक
बेवारस वृद्धांमध्ये ग्रामीण भागातील मुलांनी सोडलेल्या आईबाबांची संख्या अधिक आहे. म्हाताऱ्या आईवडिलांना आयुष्याच्या संध्याकाळी अशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार क्लेशकारक आहे.हॉस्पिटलच्या आवारात जवळपास २०० वृद्ध बेवारस स्थितीत आहेत. कुणीतरी दिलं तर खायचं नाहीतर पडून राहायचं. घाटी हॉस्पिटलचं आवार जणू वृद्धाश्रमच झाल्याचे सेवाभावी संस्था सदस्य सुमीत पंडीत यांनी सांगितले. वृद्धांना हॉस्पिटलमध्ये सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं घाटी प्रशासनाचं म्हणणं आहे.