गर्दी करू नका नाहीतर तिसरी दूरच मात्र कोरोनाची दुसरी लाटच उलटेल; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कलानगराला लागूनच एमएमआरडीएचा रस्ता झाला. त्यावर उड्डाणपूल झाला. मग धारावीचा रस्ता झाला. जिथे मोजक्याच गाड्या दिसत होत्या तिथंही आज वाहतूक कोंडी होत आहे. रहदारी वाढत असल्याने ट्राफिक वाढत चाललं आहे. त्यावर आज तोडगा काढला आहे.

    कोरोनाची दुसरी लाट काहीप्रमाणात ओसरल्याने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी काळजी घेतली नाही आणि अनावश्यक गर्दी करत राहिले तर येत्या काळात तिसरी लाट दूरच मात्र कोरोनाची दुसरी लाटच उलटेल अशी भीती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणुमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले असूनठाकरे यांनीही वाढत्या गर्दीबद्दल इशारा दिला आहे.मालाड येथील कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं.त्यावेळी ते बोलत होते.

    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,”दुसरी लाट बघितली, तर ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. खाली आहे आणि स्थिरावली आहे. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. तिसरी लाट कधी येईल हे सांगता येत नाही. मात्र नवा व्हेरिएन्ट डेल्टा प्लसने अजून रंग दाखवलेले नाहीत. पण, डेल्टाच अजूनही राज्यात आहे. गर्दी टाळली गेली नाही, तर दुसरी लाट ओसरण्याऐवजी उलटेन. ही शक्यता गृहित धरली, तर आज जे आपण करतो आहोत, त्याचं महत्त्व नागरिकांच्या लक्षात येईल,”

    एमएमआरडीएचे कौतुक
    “कलानगराला लागूनच एमएमआरडीएचा रस्ता झाला. त्यावर उड्डाणपूल झाला. मग धारावीचा रस्ता झाला. जिथे मोजक्याच गाड्या दिसत होत्या तिथंही आज वाहतूक कोंडी होत आहे. रहदारी वाढत असल्याने ट्राफिक वाढत चाललं आहे. त्यावर आज तोडगा काढला आहे. एमएमआरडीएचं कार्यालयं झालं, तिथं त्याचा फायदा झाला म्हणून ट्राफिक जाम होणाऱ्या ठिकाणी एमएमआरडीएची कार्यालये सुरू करायची का?, असं मिश्कील भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. विस्तारत चाललेल्या मुंबईसाठी मार्ग काढले जात आहे, याबद्दल मी एमएमआरडीएचं मुंबईकरांच्या वतीने कौतुक करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.