‘शुर्पणखेला’ महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवू नका,  चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. यावर भाष्य करत चित्रा वाघ यांनी हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे.

    महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नेमणूक करण्यात आली. आज याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र यावरून आता राजकीय वाकयुद्ध सुरु झाले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. चित्रा वाघ यांनी ट्विट करत ‘महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका’, असे म्हणत चांगलाच घणाघात केलाय. ‘चाकणकरांची या पदी नेमणूक झाल्यास पक्षाचे वेळोवेली कापले जाईलट’, असे देखील चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

     

    चित्रा वाघ यांचे ट्विट

    गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. यावर भाष्य करत चित्रा वाघ यांनी हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरत आहेत. पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचे नाक कापले जाईल’, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.