लसीकरणाचा वेग मंदावणे पडू शकते महागात, तज्ञांकडून महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत

लसीकरणाचा वेग(vaccination process is slow in maharashtra) महाराष्ट्रात कमी झाला आहे. लसीकरणाचा वेग असाच कमी असेल तर तिसरी लाट वेगाने पसरेल, (slow vaccination process may cause third wave of corona)असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

  मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या(corona patients in maharashtra) झपाट्याने वाढत आहे. मात्र लसीकरणाचा वेग(vaccination process is slow in maharashtra) महाराष्ट्रात कमी झाला आहे. लसीकरणाचा वेग असाच कमी असेल तर तिसरी लाट वेगाने पसरेल, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

  सध्या १ मे पासून सुरू होणारे १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. पुरेशी लस नसल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. केंद्र सरकारकडून लस येत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत.

  एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसीचा डोस दिल्यानंतरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  आरोग्य विभागाच्या मते राज्यात दीड कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींची संख्या नऊ कोटी आहे. जर वेगाने लसीकरण झाले नाही तर कोरोना रोखणे अशक्य होईल, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

  सततच्या लॉकडाऊनला लोक कंटाळले आहेत. लोक बाहेर पडायला लागले की, पुन्हा तिसरी लाट येईल. डिसेंबरमध्ये लोकांना मोकळीक दिल्याने दुसरी लाट आली.

  भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट यांच्याकडून लस मिळायला वेळ जाणार आहे. त्यामुळे लसीकरण थांबणार आहे. लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे मात्र, त्या लसी पुरेशा प्रमाणात येण्यासाठी मे महिन्याचा अखेरचा आठवडा उलटणार आहे. पावसाळा सुरु झाला की पाऊस आणि इतर समस्यांबरोबरच लसीकरण करणे अशक्य होणार आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  लसीकरणामध्ये आपण एवढा वेळ घालवला तर कोरोना नवा विषाणू निर्माण होईल ज्याच्यावर लसीचा काही परिणाम होणार नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे.