मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ दोन एसटी मार्ग बंद

कोल्हापूर - पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग १ व प्रमुख जिल्हा मार्ग १ असे २ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे समन्वय अधिकाऱ्यांनी दिली. करवीर

 कोल्हापूर – पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग १ व प्रमुख जिल्हा मार्ग १ असे २ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे समन्वय अधिकाऱ्यांनी दिली. करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराबाहेरील वळण उजळाईवाडी ते विमानतळ रस्ता रा.मा. १९४ मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर १ फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यावर २ फूट पाणी असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद आहे. पर्यायी इजिमा क्र. १८९ अनुर ते बानगे व इजिमा क्र. ९३ बानगे मार्गे वाहतुक सुरू आहे.