बनावट पासपोर्टपासून सावध राहा – महाराष्ट्र सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन

मुंबई : सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या टेम्पलेट या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळया बाजारात सहजपणे ९$ ते २३$ या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करून लोकांना देण्याचा प्रकार सुरू

 मुंबई :  सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या टेम्पलेट या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळया बाजारात सहजपणे ९$ ते २३$ या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करून लोकांना देण्याचा प्रकार सुरू आहे तेव्हा अशा बनावट पासपोर्ट पासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

सायबर भामटे हे अशा टेम्पलेट विकत घेतात व त्याला मॉडिफाय करून बनावट पासपोर्ट बनवला जातो . त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट  ओळखपत्रांचा उपयोग करून विकत घेतली जाणारी सिमकार्ड ही ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी व अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, कृपया सावध राहा. तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. तुमच्या पासपोर्टच्या स्कॅन कॉपीजना पासवर्ड देऊन सुरक्षित करा. ज्यामुळे तुमच्याशिवाय अन्य कोणाला ती फाईल ओपन करता येणार नाही . ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पासपोर्टची प्रत देणार असाल तर त्या प्रतीवर निळ्या पेनाच्या शाईने सही व त्यादिवशीची तारीख पण नमूद करा . तसेच खालील काही मुद्दे हे आपल्याला  खोट्या व खऱ्या पासपोर्टचा फरक समजण्यास  उपयोगी होतील :
 
१)पासपोर्टच्या इश्युइंग डेट  व एक्स्पायरी डेटमध्ये १० वर्षाचा फरक असला पाहिजे  २)पासपोर्टला ३६ किंवा ६० पाने असली पाहिजेत  ३)फॉन्टची साईज आणि 
अमेंटलाईन एकसारखी असली पाहिजे . ४) पासपोर्ट वरील भारताचा एम्ब्लेम नीट तपासून बघा . ५)पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पण पासपोर्ट क्रमांक पर्फोरेटेड
स्वरूपात असला पाहिजे ६)जर जुना पासपोर्ट पण उपलब्ध असल्यास त्यावरील अन्य माहिती जसे की आई वडिलांचे व आपल्या जोडीदाराचे नाव नवीन व जुन्या पासपोर्टवर  एकच असले पाहिजे. ७) जर पासपोर्ट ३६ पानी असेल तर पण क्र ३ ते ३४ वर भारताचा एम्ब्लेम (अशोक स्तंभ ) असला पाहिजे . जर कोणत्याही नागरिकाची पासपोर्ट संदर्भात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.