दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असताना महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याच्या नशीबाचे फिरले फासे, एकनाथ खडसेंना ईडीने ‘असा’ दिला दणका

भोसरी जमीन गैरव्यवहार(Bhosari land Scam) प्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांना ईडीने दणका दिला आहे.

  मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) दिल्लीत (Delhi) सुरू आहे. नवीन नेते हे मंत्रिपदाची शपथ घेत असताना आता राज्यातील एका नेत्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या एकनाथ खडसेंना ईडीने समन्स जारी केले आहे. (ED summons NCP leader Eknath Khadse)

  भोसरी जमीन गैरव्यवहार(Bhosari land Scam) प्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांना ईडीने दणका दिला आहे.

  ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना 12 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

  ईडीने एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच दरम्यान एकनाथ खडसे हे 8 जुलै रोजी एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं एनसीपीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केले. मात्र, आता एकनाथ खडसेंना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास समन्स बजावण्यात आल्याने ही पत्रकार परिषद होते की नाही हे पहावं लागेल.

  जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्यावर आता ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स जारी करत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने जारी केलेल्या समन्सनुसार एकनाथ खडसे यांना 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

  पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर आज सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.