नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? एकनाथ खडसेंकडून फडणवीसांना पुन्हा टोला

एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्या जीवनावरील सुनील नेवे लिखित पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ ख़डसे ( Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांच्या जीवनावरील सुनील नेवे लिखित पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, माझ्यावर अन्याय झाला आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षाच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार. मुख्यमंत्री तेव्हा अंजली दमानिया यांना वेळ देत भेटत होते. पण खडसें यांना भेटत नव्हते. पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट मिळायची. मात्र खडसे यांना निर्दोष असतांना क्लिनचिट मिळाली नाही, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

दरम्यान, मला जो त्रास झाला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो. मला उध्वस्त करण्याचे काम केले. मला पक्षाचा कधी विरोध झाला नाही तर व्यक्तीने केला. माझी ताकद माझा कार्यकर्ता, माझी जनता, असे सांगत नव्या वाटचालीबाबत खडसे यांनी सांगितले आहे.