शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी अन्य शाळेत प्रवेश मिळणार

विद्यार्थ्यांना दाखलेअभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक/शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल. असेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी त्यांना अन्य शाळेत प्रवेश मिळणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी ‘ट्विटर’द्वारे दिली.कोरोना काळात मुलांची फी भरणे पालकांना कठीण झाले आहे. त्यामुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी अन्य शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला काही शाळा नाकारत असल्याचे कळते. दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात आहे.ही कृती शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारी आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन पुढील कार्यवाही करावी. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

    तर कारवाई होणार