‘संसद सोडून संपूर्ण देश खुला आहे’, अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णयावर उर्मिला मातोंडकरांची टीका

शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर(urmila matondkar) म्हणाल्या की, “राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड मोठ्या सभा घेण्यात आल्या. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जात आहेत, ती संसद वगळता संपूर्ण देश खुला झाला आहे. खरोखरच खूप लोकशाही आहे. (टू मच डेमोक्रसी).”

केंद्र सरकारनं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे. त्यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर(urmila matondkar) यांनीही टीका केली आहे. “सर्वपक्षीय संमतीविनाच इथे कायदे लादले जात आहेत. संसदेशिवाय संपूर्ण देश खुला झाला आहे,” असा टोला मातोंडकर यांनी लगावला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. संसदेचे अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णयावरून आता टीका होऊ लागली आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सरकारला प्रश्न विचारला जात आहे.

शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, “राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड मोठ्या सभा घेण्यात आल्या. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जात आहेत, ती संसद वगळता संपूर्ण देश खुला झाला आहे. खरोखरच खूप लोकशाही आहे. (टू मच डेमोक्रसी).”