नांदेड सहस्रकुंड धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या, तपासात धक्कादायक कारण आले समोर

सहस्त्रकुंड धबधबा नदी पात्रात परोटी ग्रामस्थांनी मृतदेह वाहत असल्याचे पाहिले होते. त्यानंतर बिटरगाव पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर या मृतदेहाचा शोध घेतला. तो मृतदेह सहस्त्रकुंड धबधबा पासून एक किमी अंतरावर पैनगंगा नदीपात्रात सापडला. याबाबत आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • संपत्तीच्या वादातून कुटुंबाने केली आत्महत्या

नांदेड : नांदेडमधील (Nanded) सहस्त्रकुंड धबधब्यावरुन ( Sahasrakund waterfall) उडी मारुन एकाच कुटुंबातील पत्ती-पत्नी व तीन मुलांनी आत्महत्या (family commit suicide ) केल्याची घटना उघडकीस आली आहे. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले तर २ जण अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर कुटुंब हे हदगाव तालुक्यातील कवान येथील रहिवाशी असल्याचे समजते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहस्त्रकुंड धबधबा नदी पात्रात परोटी ग्रामस्थांनी मृतदेह वाहत असल्याचे पाहिले होते. त्यानंतर बिटरगाव पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर या मृतदेहाचा शोध घेतला. तो मृतदेह सहस्त्रकुंड धबधबा पासून एक किमी अंतरावर पैनगंगा नदीपात्रात सापडला. याबाबत आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रेताची ओळख पटली असून, हे प्रेत हदगाव येथील प्रवीण कवानकर (४० वर्षे), त्याची पत्नी अश्विनी (३८), मुलगी (२०) सेजल, मुलगी समीक्षा (१४), मुलगा सिद्धेश (१३) यांनी सहस्त्रकुंड धबधब्यात उडी घेत आत्महत्या केली. बुधवारी कवानकर कुटुंब आपल्या गाडीतून यवतमाळ जिल्ह्याच्या दिशेने असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबब्यावर गेले होते.

 NANDED
गुरुवारी यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीच्या पात्रात अश्विनी कवानकर आणि मुलगा सिद्धेश याचा मृतदेह आढळला. तर प्रवीण कवानकर यांचा मृतदेह नांदेड जिल्ह्याच्या बाजूने इस्लापूर हद्दीत आढळला. समीक्षा आणि सेजल या दोघीचा मृतदेह अजून सापडलेला नाही. दरम्यान कवानकर कटुंबियांचे हदगाव येथे मोठे किराना दुकान आहे. कौटुंबिक किंवा भावासोबत असलेल्या मालमत्तेच्या वादातून या कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.