पुरग्रस्तांसाठी आज जाहिर होणार विशेष आर्थीक पॅकेज? मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे असा प्राथमिक अंदाज राज्य सरकारने नुकताच वर्तवला आहे. यात कोकणातील रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत यांचा यात समावेश आहे.

    राज्याच्या अनेक भागात पुराचे (Maharashtra flood) संकट आहे. कोकण, कोल्हापूर परिसराला याचा मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्तांना आज दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Government cabinet meeting) होणार आहे. या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीचे पॅकेज (Flood relief package) घोषित होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

    आज बुधवारी 28 तारखेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक प्रदीर्घ असणार आहे. दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसानीच सादरीकरण होणार आहे. प्रत्येक विभागाकडून नुकसानीची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आपत्तीग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.

    राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे असा प्राथमिक अंदाज राज्य सरकारने नुकताच वर्तवला आहे. यात कोकणातील रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत यांचा यात समावेश आहे.

    दरम्यान, अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह आठ जिल्ह्यांतील घरांची, मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत कायमस्वरूपी उपाय करण्याचा विचार करूनच शासन मदत करेल, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.