सलग तिसऱ्या दिवशी राज्यात सापडले हजारपेक्षा अधिक रुग्ण

राज्यात १०८९ नवे रुग्ण, मृत्यू ३७ मुंबई :राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सलग तीन दिवसांपासून राज्यात हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. ही बाब

 राज्यात १०८९ नवे रुग्ण, मृत्यू ३७

मुंबई :राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सलग तीन दिवसांपासून राज्यात हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. ही बाब राज्यासाठी चिंतेची ठरत आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असताना गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णांनी सलग तीन दिवस एक हजारांचा आकडा पार केला.

राज्यात शुक्रवारी तब्बल १०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ७४८ रुग्ण सापडले. शुक्रवारी राज्यात सापडलेल्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे.

राज्यात ३७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईमधील २५, पुण्यातील १० , जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १९ पुरुष तर १८ महिला आहेत. तसेच ३७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३७ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७३१ झाली आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,१२,३५० नमुन्यांपैकी १,९२,१९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १९,०६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३,५५२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५२.६४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

सध्या राज्यात २,३९,५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. शुक्रवारी १६९ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आतापर्यंत ३४७० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू

१ मुंबई महानगरपालिका १२१४२ ४६२

२ ठाणे १०१ २

३ ठाणे मनपा ७२४ ८

४ नवी मुंबई मनपा ७१६ ४

५ कल्याण डोंबवली मनपा २८४ ३

६ उल्हासनगर मनपा १५ ०

७ भिवंडी निजामपूर मनपा २१ २

८ मीरा भाईंदर मनपा १९२ २

९ पालघर ४६ २

१० वसई विरार मनपा १९४ ९

११ रायगड ८१ १

१२ पनवेल मनपा १३२ २

ठाणे मंडळ एकूण १४६४८ ४९७

१३ नाशिक ४७ ०

१४ नाशिक मनपा ६० ०

१५ मालेगाव मनपा ४५० १२

१६ अहमदनगर ४४ २

१७ अहमदनगर मनपा ९ ०

१८ धुळे ८ २

१९ धुळे मनपा २४ १

२० जळगाव ८२ १२

२१ जळगाव मनपा १४ २

२२ नंदूरबार १९ १

नाशिक मंडळ एकूण ७५७ ३२

२३ पुणे ११० ४

२४ पुणे मनपा १९३८ १३२

२५ पिंपरी चिंचवड मनपा १२९ ३

२६ सोलापूर ६ ०

२७ सोलापूर मनपा १७९ १०

२८ सातारा ९४ २

 

पुणे मंडळ एकूण २४५६ १५१

२९ कोल्हापूर १० १

३० कोल्हापूर मनपा ६ ०

३१ सांगली ३२ ०

३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३ १

३३ सिंधुदुर्ग ५ ०

३४ रत्नागिरी १७ १

कोल्हापूर मंडळ एकूण ७३ ३

३५ औरंगाबाद ५ ०

३६ औरंगाबाद मनपा ४१८ १२

३७ जालना १२ ०

३८ हिंगोली ५८ ०

३९ परभणी १ १

४० परभणी मनपा १ ०

 

औरंगाबाद मंडळ एकूण ४९५ १३

४१ लातूर २५ १

४२ लातूर मनपा ० ०

४३ उस्मानाबाद ३ ०

४४ बीड १ ०

४५ नांदेड ३ ०

४६ नांदेड मनपा २९ २

लातूर मंडळ एकूण ६१ ३

४७ अकोला ९ १

४८ अकोला मनपा ११२ ९

४९ अमरावती ४ १

५० अमरावती मनपा ७६ १०

५१ यवतमाळ ९५ ०

५२ बुलढाणा २४ १

५३ वाशिम १ ०

अकोला मंडळ एकूण ३२१ २२

५४ नागपूर २ ०

५५ नागपूर मनपा २१० २

५६ वर्धा ० ०

५७ भंडारा १ ०

५८ गोंदिया १ ०

५९ चंद्रपूर १ ०

६० चंद्रपूर मनपा ३ ०

६१ गडचिरोली ० ०

नागपूर एकूण २१८ २

 

इतर राज्ये ३४ ८

 

एकूण १९०६३ ७३१